Maharashtra News : ठाण्यातील घोडबंदर परिसरात मेट्रो-४ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक ही संथगतीने सुरू ठेवण्यात आली आहे.
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा ते आनंदनगरदरम्यान सीपीसी, टी व आय गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
या वाहतूक मार्गातील बदलामुळे आता वाहनचालकांना आणि नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ८ ते १८ जुलै या कालावधीत रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने,
अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने जातील. व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांनाकापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद आहे. मुंब्रा-कळवामार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
घोडबंदूवरील रस्त्यांच्या वाहतुकीत बदल
• पर्यायी मार्ग : कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूर फाटा मार्गे वाहने मार्गक्रमण करतील. कापूरबावडी जंक्शनला वळून कशेळी, अंजूर फाटामार्गे इच्छितस्थळी जातील.
• पर्यायी मार्ग : गॅमनमार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूर फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.