पंजाबराव डख साहेबांनी थेट तारीख सांगितली अहमदनगर जिल्ह्यात या दिवशी होणार पाऊस

Published on -

Panjabrao Dakh : यंदा निसर्गचक्र हे २२ दिवसांनी पुढे ढकलले असून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे. आज बुधवार ते (दि. १४) जुलै संगमनेर तालुक्यात पाऊस होणार आहे.

मंगळवार (दि.१८) ते (दि. २४) या काळात अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला. काल मंगळवारी पंजाब डख यांनी संगमनेरात धावती भेट दिली. तेव्हा ते काही वेळ यशोधन जनसंपर्क कार्यालयात थांबले होते.

याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील अंदाज व्यक्त केला. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मुख्याधिकारी श्रीराम कुन्हे पी. वाय. दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे, विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

यावेळी डख म्हणाले की, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मात्र काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. २२ दिवसांनी हवामान पुढे ढकलले असून यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले.

आमदार बाळासाहेब थोरात हे सर्वत्र लोकप्रिय असून शेती, सर्वसामान्य माणूस यांच्या निगडित प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपल्याला कायम आदर राहिला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व आणि संगमनेरचा विकास राज्याला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसामान्यांची कामे करण्यासाठी अविरत सेवा देणारे यशोधन कार्यालय हे अभिनव कार्यालय असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, पाऊस आणि पंजाब डख हे एक समीकरण झाले असून शेतकऱ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशा परिस्थितीत त्यांनी यावर्षी चांगला पाऊस होणार ही सुखद वार्ता दिल्याने सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News