Monsoon Toruist Place : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका पावसाळ्यात निसर्गसंपदेने बहरलेला असतो. राजगड, तोरणा, लिंगाणा किल्ले आणि धबधबे पर्यटकांना वेल्हे तालुक्याकडे आकर्षित करताना दिसतात.
आधुनिक काळातही पर्यावरण अबाधित ठेवून निसर्गसौंदर्य जपणारा हा तालुका निसर्गसौंदर्याच्या बाबतीत वरचढ ठरतो. निसर्गाची काळजी घेऊन आणि निसर्गाचा मान तर निसर्ग राखून आस्वाद घेतला तर आपल्याला भरभरून देतो,
हा अनुभव आपणास वेल्हे तालुक्यात पर्यटन करताना येतो. स्वच्छ आणि नैसर्गिक संपदेने नटलेला हा तालुका भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आणि ट्रेकर्सच्या मनात आपली एक वेगळी ओळख कायम ठेवतोच, असे अनेक पर्यटकांना आलेले अनुभव आहेत.
तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत, त्यापैकी ‘मढेघाट’ हे एक महत्त्वाचे पावसाळ्यात भेट देण्यासारखे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. बेल्हेपासून १८ किमीवर असलेले हे पर्यटनस्थळ म्हणजे, पृथ्वीवरील जणू स्वर्गच असे म्हटले तर ते चावगे ठरणार नाही.
या घाटाकडे जाताना वाटेत अनेक छोटेमोठे धरणाचा दृष्टीस पडतात. हे धबधबे जणुकाही मढेघाटाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे भासते. डोंगराळ भागाने घेरलेला हा परिसर पावसाळ्यात हिरवाईचा शालू नेसून स्वागतासाठी सज्ज असतो.
तोरणा किल्ल्याच्या मागे घनदाट जंगलात असलेला महेघाट पसंतीस उत्तरतो तो येथील धबधब्यामुळे हा धबधबा पावसाळ्यात उंचीवरून खोल दरीत कोसळतो. तीन बाजूंनी डोंगर आणि मधून कोसळणारा धबधबा पाहताना डोळ्यांचे पारणे फिटल्याचा अनुभव पर्यटकांना येतोच.
हा लक्ष्मी या नावाने प्रसिद्ध आहे. दाट धुके आणि पावसाळी वातावरण येथील सौंदर्य अजूनच वि. नैसर्गिक वातावरणातील येथील कांदा भजी, पिठलं-भाकरी खवय्यांसाठी मेजवानीच ठरते. रायगड, लिंगाणा, वरंधा घाट, शिवथरघळ इत्यादी ठिकाणांचे दर्शन येथून होते.
ऐतिहासिकदृष्ट्या विचार करायचा शाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती शुरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडाच्या लढ्यामध्ये वीरमरण आले, त्या वेळी त्यांचे पार्थिव याच घाटातून त्यांच्या गावी नेण्यात आले होते, म्हणून या स्थळाला ‘मढेघाट’ म्हणून ओळखले जाते.
येथे ऐतिहासिक अवशेषही येथे दिसून येतात. भविष्यात ‘मढेघाट ते कोकण प्रवास सुलभ आणि कमी वेळेत कसा शक्य होऊ शकतो तसे प्रयत्न स्थानिक पातळीवर चालू असल्याचे येथे दिसून येते.
सध्या कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सुरू असणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात असणारे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे विकेंडला पुण्यासह विविध शहरातील पर्यटक अशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन आनंद लुटत असल्याचे चित्र दिसत आहे.