Kia Seltos Facelift Booking : कियाच्या नव्या कारचे बुकिंग झाले सुरु ! फक्त २५,००० रुपयांत करा बुक

Tejas B Shelar
Updated:
Kia Seltos Facelift Pre Booking

Kia Seltos Facelift Pre Booking : कोरियन ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Kia ने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या बेस्ट सेलिंग कार सेल्टोसची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च केली. या कारचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.

तुम्हाला Kia Seltos Facelift विकत घ्यायची असेल, तर तुम्ही आजच ही कार २५,००० रुपयांच्या टोकन मनीसह बुक करू शकता. मात्र, कंपनीने या कारची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण Kia Seltos Facelift ची किंमत येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये कंपनीने आतील आणि बाहेरील भागात काही बदल केले आहेत. कंपनीने कारमध्ये टर्बो इंजिन दिले आहे.

कारमध्ये कंपनीने 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरूफ, 8 इंच हेड्स अप डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यासह अनेक फीचर्स दिले आहेत. याशिवाय सुरक्षेच्या बाबतीत, या कारमध्ये 17 ADAS वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल देखील उपलब्ध आहेत.

कंपनीची ही कार 2 पॉवरट्रेनसह येते. कंपनीने या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल आणि टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. 1.5 लिटर पेट्रोल इंजिन जास्तीत जास्त 115hp पॉवर आणि 144nM कमाल टॉर्क जनरेट करते.

याशिवाय, कारमधील 1.5-लिटर टर्बो डिझेल इंजिन 116hp ची कमाल पॉवर आणि 250 nm टॉर्क जनरेट करते. कारला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तर डिझेल इंजिनला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतात.

नवीन सेल्टोसला पूर्वीपेक्षा थोडा मोठा बंपर देण्यात आला आहे. याशिवाय या कारमध्ये हेडलाइट्स पुन्हा डिझाइन करण्यात आले आहेत. कारला LED DRLs मिळतात, जे लोखंडी जाळीपर्यंत पसरतात. नवीन सेल्टोसमध्ये 18 इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

मागील बाजूस पाहिल्यास डिझाइनमध्ये फारसा बदल झालेला नाही. कारच्या मागील बाजूस L-आकाराचे टेललाइट्स आहेत, जे LED लाइटबारशी जोडलेले आहेत. कारमध्ये एलईडी टर्न इंडिकेटरही देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe