LPG Cylinder Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस बद्दल होतंय भलतंच प्रकरण

Ahmednagarlive24 office
Published:
LPG Cylinder Navi Mumbai

LPG Cylinder Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक कारणांमुळे तुटवडा निर्माण झाला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीद्वारे ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम चालू आहे.

यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वीच कंपनीद्वारे जनतेला काही प्रमाणात सेवा पुरवण्यात असुविधा निर्माण होईल, असे आवाहनही करण्यात आले होते. सिलिंडरची नोंदणी केल्यास २ दिवसांत तो मिळण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडली आहे.

मात्र नोंदणी केल्यावरही २ दिवसांत सिलिंडर न आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जो तो सिलेंडरची गाडी कधी येते याची वाट पाहू लागला. अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी रांगा लागल्या. १० दिवसापूर्वी नोंदणी केलेल्यांना सिलिंडर न देता एक दिवसापूर्वी नोंदणी केलेल्यांना सिलिंडर दिला जात असल्याचा आरोप काही गृहिणींनी केला आहे.

मागील दोन आठवड्यांपासून विविध गॅस एजन्सीला त्यांच्या मागणीनुसार पुरवठा होत नाही. अनेक ग्राहक नेहमीच्या सवयीप्रमाणे गॅस सिलिंडरची गाडी आल्यावर त्या ठिकाणी जाऊन बुकिंग करतात आणि त्यानंतर त्यांना त्वरित सिलिंडर दिला जातो किंवा त्याच दिवशी दिला जातो.

अशी प्रक्रिया काही ठिकाणी राबवली जात होती. परंतु माहिती अद्ययावत करताना ज्या ग्राहकांची आगाऊ नोंदणी झाली किमान त्या प्रमाणातही पुरवठा होत नव्हता. परिणामी तात्काळ बुकिंग नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे.

कंपनीच्या यंत्रणेमधील माहिती अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे सध्या जिथे दररोज ३ गाड्या सिलिंडरची मागणी आहे तिथे केवळ १ गाडीच मिळत आहे. माहिती अद्ययावत होताच लवकरच पूर्वीप्रमाणे पुरवठा होईल. तसेच नोंदणीच्या क्रमानुसार ग्राहकांना सिलेंडर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe