PF Account Balance Checking Tips : पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या सहज पीएफ खातेधारक खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतात.
सरकारी किंवा खाजगी नोकरदाराच्या पगारातील काही टक्के रक्कम पीएफ खात्यामध्ये वर्ग केली जाते. तसेच सरकारकडून पीएफ खातेदाराच्या पगारातून कापलेल्या रकमेइतकी रक्कम दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ खात्याद्वारे चांगला फायदा होत असतो.

जर तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पीएफ मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा देखील मिळवू शकता.
पीएफ खातेदार एका वर्षात कमी कमी ५०० आणि जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तसेच पीएफ खात्यातील गुंतवणूकदार वेगवेगळ्या पद्धतीने घरबसल्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतात.
पीएफ खात्यातील कर्मचारी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने खात्यातील शिल्लक पीएफ रक्कम तपासू शकतात. पीएफ खातेधारकांना आता पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
एसएमएसद्वारे कसे कळेल?
जर तुम्हाला घरबसल्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर 7738299899 वर ‘EPFOHO UAN ENG’ असा मजकूर संदेश पाठवा. या मजकुरातील शेवटची तीन अक्षरे तुम्हाला कोणती भाषा हवी आहे हे दर्शवतात. तुम्ही इंग्रजी, हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, तेलुगु, मल्याळम आणि गुजराती अशा एकूण 10 भाषामध्ये तुम्ही पीएफ खात्याबद्दल माहिती मिळवू शकता.
यानंतर तुम्हाला तुकम्ह्णा पीएफ खात्याचा UAN म्हणजेच मोबाईल नंबर युनिव्हर्सल अकाउंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. मोबाईल एसएमएस द्वारे तुम्हाला शिल्लक रक्कम समजेल.
मिस कॉलवरूनही जाणून घ्या
जर तुम्हाला मिस कॉलद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर ते सहज तपासू शकता. तुमच्या UAN नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊन पीएफ शिल्लक तपासू शकता.
उमंग अॅपवरून कसे करायचे?
जर तुम्हाला मिस कॉल आणि मोबाईल एसएमएस द्वारे पीएफ रक्कम तपासायची नसेल तर तुम्ही उमंग अॅपवरून देखील पीएफ खात्यातील रक्कम तपासू शकता. यासाठी तुम्हाला उमंग अॅप डाउनलोड करावे लागेल.
१. सर्वप्रथम, अधिकृत EPFO वेबसाइटला भेट द्या आणि ‘आमच्या सेवा टॅब’ निवडा.
२. येथे तुम्हाला ‘कर्मचाऱ्यांसाठी’ वर क्लिक करावे लागेल.
३. त्यानंतर ‘सदस्य पासबुक’ निवडा आणि तुमचा PF खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाका.
४. जे एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये काम करतात त्यांना वेगवेगळ्या सदस्य आयडीद्वारे त्यांचे पीएफ शिल्लक तपासावे लागते.