Maruti Suzuki Fronx Car : लॉन्च होताच मारुतीच्या ‘या’ कारला देशातच नाही तर विदेशात देखील सर्वाधिक मागणी! जबरदस्त मायलेजसह किंमत आहे 8 लाखांपेक्षा कमी

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Suzuki Fronx Car : मारुती सुझुकी कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच ग्राहकांचा या नवीन कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक विक्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहेत.

मारुती सुझुकी कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रात त्यांच्या अनेक नवीन लक्झरी कार सादर केल्या जात आहेत. तसेच या कारमध्ये अनके धमाकेदार वैशिष्ट्ये देखील देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशात धमाकेदार वैशिष्ट्ये असलेल्या कार खरेदीची संधी मिळत आहे.

मारुती सुझुकीकडून एप्रिल महिन्यामध्ये स्टायलिश कार Fronx लॉन्च करण्यात आली आहे. तसेच या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कारची देशातच नाही तर विदेशातही प्रचंड मागणी आहे.

1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 100 bhp पॉवर देते

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या नवीन Fronx कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 90 bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कंपनीकडून 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बो बूस्टर जेट पेट्रोल इंजिन देखील देते, जे 100 bhp पॉवर आणि 147.6 Nm टॉर्क जनरेट करते.

समोरील बाजूस नेक्स वेव्ह ग्रिल आणि क्रिस्टल ब्लॉक LEDs

मारुती सुझुकीच्या नवीन Fronx कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच कारमध्ये पुढील बाजूस नेक्स वेव्ह ग्रिल आणि क्रिस्टल ब्लॉक एलईडी डीआरएल देण्यात आला आहे. ही कार Tata Nexon, Hyundai Venue, KIA Sonet आणि Nissan Magnite ला टक्कर देऊ शकते असा दावा करण्यात येत आहे.

लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत कारला मोठी मागणी 

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची Fronx ही कार लॉन्च केल्यानंतर देशातच नाही तर विदेशात देखील तिला प्रचंड मागणी आहे. लॉन्च झाल्यानंतर देशांतर्गत बाजारात विक्रमी 9,683 युनिट्सची विक्री केलीय आहे तर विदेशात 556 युनिट्सची निर्यात केलीय आहे.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स मधील डिझायनर अलॉय व्हील्स

Fronx कारमध्ये कंपनीकडून डिझायनर अलॉय व्हील्स देण्यात येत आहेत. तसेच कारची लांबी 3,995 मिमी, उंची 1,550 मिमी आणि रुंदी 1,765 मिमी आहे. कारचे आकर्षक अलॉय व्हील्स तिला जबरदस्त लूक देतात.

Maruti Suzuki Fronx ला 37-लीटरची इंधन टाकी

मारुती सुझुकी कंपनीकडून Fronx कारमध्ये 37 लिटरची पेट्रोल टाकी देण्यात येत आहे. तसेच ही कार 22.89 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम असल्याचा देखील दावा करण्यात येत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपयांपासून सुरु होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe