Best Smartwatches In India : सर्वोत्तम ब्लूटूथ स्मार्टवॉच खरेदी करायचंय? हे आहेत ५ पर्याय, किंमतही आहे बजेटमध्ये

Ahmednagarlive24 office
Published:
Best Smartwatches In India

Best Smartwatches In India : सध्या जुन्या घड्याळाची जागा आता स्मार्टवॉचने घेतली आहे. भारतीय बाजारातपेठेत अनेक कंपन्यांच्या स्मार्टवॉच लॉन्च झाली आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकजण ते खरेदी करू शकत नाही.

मात्र जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच कमी बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टवॉचमध्ये अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये देखील देण्यात येत आहेत. SPO2 सह ब्लूटूथ कॉलिंग वैशिष्ट्य देखील या स्मार्टवॉचमध्ये देण्यात येत आहेत.

तसेच स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेससह जीवनशैलीतील घटक देखील उपलब्ध आहेत. कॉलिंग आणि हेल्दी-फिटनेस वैशिष्ट्यांसह अनके स्मार्टवॉच भारतात उपलब्ध आहेत. ५ हजार रुपयांच्या कमी किमतीमध्ये तुम्ही ही स्मार्टवॉच खरेदी करू शकता.

फायर-बोल्ट रिंग 2 स्मार्टवॉच

फायर-बोल्टची अनेक स्मार्टवॉच भारतात उपलब्ध आहेत. जर तुम्हीही या कंपनीची बजेटमधील स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी फायर-बोल्ट रिंग 2 हे वॉच सर्वोत्तम पर्याय आहे. 240×280 पिक्सेलच्या फुल टच स्क्रीन रिझोल्यूशनसह 1.69-इंच HD डिस्प्ले या स्मार्टवॉचमध्ये देण्यात येत आहे. या स्मार्टवॉचची किंमत 4,499 रुपये आहे.

Pebble Cosmos Hues Smartwatch

तुम्हीही कमी किमतीतील स्मार्टवॉच शोधत असाल तर Pebble Cosmos Hues हे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचची किंमत 1,999 रुपये आहे. कमी किमतीमधील या स्मार्टवॉचमध्ये अनके जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत.

क्रॉसबीट्स इग्नाइट स्पेक्ट्रा स्मार्टवॉच

तुम्हालाही जबरदस्त वैशिष्ट्ये असलेले स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी बाजारात क्रॉसबीट्स इग्नाइट स्पेक्ट्रा स्मार्टवॉच उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.78-इंचाचा सुपर रेटिना AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. हे स्मार्टवॉच ब्लूटूथला सपोर्ट करते.

ब्लूई पल्स स्मार्टवॉच

ब्लूई पल्स स्मार्टवॉच तुमच्या बजेटमध्ये येऊ शकते. तुम्ही फक्त 2,299 रुपयांच्या किमतीमध्ये हे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये 2.0-इंच स्क्रीन आणि 2TFD HD IPS 240*280 pixels डिस्प्ले देण्यात येत आहे.

Zoook Dash स्मार्टवॉच

तुम्हीही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Zoook Dash स्मार्टवॉच तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते. या स्मार्टवॉचची बाजारातील किंमत 2,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंच फुल एचडी आयपीएस टच स्क्रीन देण्यात येत आहे. तसेच 19 विविध स्पोर्ट्स मोड्स देखील देण्यात येत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe