Vastu Tips : घराच्या मुख्य दारात ही झाडे ठेवताच दूर होईल वास्तुदोष, घरात येईल पैसाच पैसा

Published on -

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आणि घराच्या आसपास काही झाडे असणे अशुभ मानले जाते. तसेच घराच्या परिसरात किंवा घरामध्ये काही झाडे असणे शुभ देखील मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आर्थिक समस्या देखील निर्माण होत नाही.

वास्तुशास्त्रामध्ये घरासंबंधी आणि घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंसंबंधी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तसेच घरातील काही चुकांमुळे वास्तुदोष निर्माण होत असतात. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ नयेत यासाठी वास्तुशास्त्रात अनेक मार्ग सांगण्यात आले आहे.

घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्यास तुमच्याच काही चुका कारणीभूत असतात. तुम्ही अनेकदा घरामध्ये चुकीच्या दिशेला चुकीच्या वस्तू ठेवत असतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर काही झाडे ठेवल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषत दूर होऊ शकतो.

ही रोपे मुख्य दारात ठेवा

तुम्हालाही तुमच्या घरामध्ये वास्तुदोष नको असेल तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही झाडे ठेवणे शुभ मानले जाते. तुळशीचे रोप दरवाजामध्ये ठेवणे कधीही शुभ मानले जाते. हे एक औषधी गुणधर्मांची परिपूर्ण असलेले रोप आहे.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अधिक महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर हे रोप ठेवणे फायदेशीर मानले जाते. तसेच असे केल्याने वास्तुदोष दूर होतो असे देखील सांगितले जाते.

मनी प्लांट असा ठेवा

घरच्या मुख्य दरवाजामध्ये मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. तसेच देवी लक्ष्मी माता यामुळे प्रसन्न होते आणि घरामध्ये कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही. मात्र घरामध्ये मनी प्लांट लावताना त्याच्या फांद्या जमिनीवर येऊ नये याची काळजी घ्या. अन्यथा तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

शमी वनस्पती

हिंदू धर्मामध्ये शमी वनस्पतीला अधिक महत्व आहे. शमीची वनस्पती भगवान शंकराची आवडती वनस्पती मानली जाते. शनिवारी या वनस्पतीची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर शमीची वनस्पती लावणे देखील शुभ असते. घरामध्ये सुख समृद्धी राहते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक समस्या निर्माण होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe