Home Loan Types : गृहकर्जाचे किती प्रकार आहेत? कोणत्या गृहकर्जापासून तुम्हाला होईल फायदा? जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Types : आजकाल अनेकांचे स्वप्न असते की स्वतःचे छोटे का होईना पण एक छोटेसे घर असावे. मात्र घर बांधणे सोपे राहिलेले नाही. कारण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे घर बांधण्यासाठी अधिक पैसे खर्च होत आहेत.

घर बांधण्यासाठी अधिक पैसे लागत असल्याने अनेकजण गृहकर्ज काढतात. मात्र गृहकर्ज काढताना त्याचे देखील अधिक प्रकार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणते गृहकर्ज परवडेल आणि तुमची क्षमता जितकी असेल तेवढेच गृहकर्ज काढावे.

सरकारी बँकाबरोबरच दुसऱ्या आर्थिक संस्था देखील गृहकर्ज देत असतात. जर तुम्हीही तुमचे नवीन घर बांधण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सर्वात आगोदर गृहकर्जाचे प्रकार जाणून घेतले पाहिजे.

गृहकर्जाचे किती प्रकार आहेत

नवीन घराची इमारत बांधण्यासाठी बँक दोन प्रकारचे गृहकर्ज देत असतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गृहकर्ज घेऊ शकता. तुम्ही स्वतःचे घर बांधत असाल तर तुम्ही गृहनिर्माण कर्ज घेऊ शकता. तसेच बँकेकडून तुम्हाला गृह विस्तार कर्ज देखील देते.

तुम्हाला तुमचे पहिले घर वाढवायचे असेल तर तुम्ही गृह विस्तार कर्ज घेऊ शकता. तसेच तुम्हाला एखादा जमिनीचा प्लॉट खरेदी करायचे असेल तर तुम्ही जमिनी खरेदी कर्ज देखील घेऊ शकता.

तसेच जर तुमचे जुने घर तुम्हाला दुरुस्त करायचे असेल तर तुम्ही गृह सुधारणा कर्ज देखील देखील बँकेकडून घेऊ शकता. बँकेकडून तुम्हाला अनेक प्रकारची कर्ज ऑफर केली जातात मात्र तुम्ही जे कर्ज घेत आहेत त्याचे सर्व तपशील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

गृहकर्जामध्ये तुमच्यासाठी कोणते कर्ज सर्वोत्तम आहे

बँकेकडून तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर तुमच्यासाठी कोणते कर्ज सर्वोत्तम आहे हे जाणून घ्या. तसेच गृहकर्ज घेताना तुमच्या गरजेनुसार कर्ज घ्या. तसेच बँक तुम्हाला देत असलेल्या कर्जावर किती टक्के व्याजदर आकारात आहे हे देखील जाणून घ्या.

प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असू शकते. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही घेत असलेल्या कर्जाचा व्याजदर जाणून घ्या. तुम्ही घरबसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने कर्जाचे तपशील जाणून घेऊ शकता. तसेच जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्ही कर्जाचे तपशील जाणून घेऊ शकता.

गृह कर्ज मर्यादा

कोणत्याही बँकेकडून कर्ज देताना सर्वात प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर पाहिला जातो. त्यानंतर बँकेकडून तुम्हाला गृहकर्जच नाही तर इतर कर्ज दिली जातात. तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला गृहकर्ज दिले जाते. जर तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुम्हाला दुप्पट कर्ज देखील जाऊ शकते.