Business Idea : नोकरीची चिंता सोडा! फक्त ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, मिळेल बक्कळ नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : आजकाल अनेकजण नोकरी सोडून व्यवसायाच्या शोधात आहेत. तसेच कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे आता नोकरी न करता अनेकांना व्यवसाय करायचा आहे. मात्र व्यवसाय करताना अनेकजण चुकीच्या पद्धतीने त्याची सुरुवात करतात.

व्यवसाय सुरु करताना अनेक प्रकारच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सुरुवातील कमी बजेट व्यवसाय सुरु करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच व्यवसायाची निवड करताना कमी बजेटमध्ये अधिक नफा देणाऱ्या व्यवसायाची निवड करणे आवश्यक आहे.

तुम्हीही व्यवसायाच्या शोधात तर तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. तुम्ही ५० हजार रुपयांमध्ये तुमचा स्वतःचा स्टेशनरीचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायामधून तुम्ही बक्कळ नफा कमवू शकता.

तुम्ही तुमचे स्टेशनरी स्टोअर उघडू शकता

तुम्हीही कमी बजेटमधील व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी स्टेशनरी स्टोअरचा व्यवसाय सर्वोत्तम ठरू शकतो. हा व्यवसाय तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत सहज सुरु करू शकता. सध्या स्टेशनरीची सर्वत्र मागणी आहे. तसेच शाळा किंवा कॉलेजच्या बाहेर तुम्ही हे दुकान सुरु करू शकता. पुस्तके, पेन्सिल, नकाशे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वस्तू तुम्ही दुकानांमध्ये ठेऊ शकता.

नफा वाढवण्यासाठी या गोष्टी करा

जर तुम्ही स्टेशनरी स्टोअर सुरु करून व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही नफा वाढवण्यासाठी या स्टोअरमध्ये मुलांशी संबंधित खेळणी आणि क्रिएटिव्ह गेम्स देखील ठेवू शकता.

तसेच तुम्ही ऑफिसच्या वस्तू देखील तुमच्या स्टोअरमध्ये ठेऊ शकता. फाईल्स, पेन, स्टेपलर यासारख्या वस्तूही तुम्ही दुकानात ठेऊन तुम्ही चांगला नफा कमवू शकता. महाविद्यालयांचे पुस्तक-रजिस्टरही तुम्ही तुमच्या व्यवसायात चांग नफा कमवू शकता.

दुकानासाठी चांगली जागा शोधा

जर तुम्हाला स्टेशनरीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम दुकानासाठी चांगली जागा शोधणे आवश्यक आहे. शाळा-कॉलेज किंवा जास्त ऑफिस असणाऱ्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

30-40 टक्के निव्वळ नफा

स्टेशनरी व्यवसायातून तुम्ही बक्कळ नफा कमवू शकता. या नफ्यातून तुम्ही निव्वळ 30-40 टक्के नफा कमवू शकता. मात्र स्टेशनरी दुकान सुरु करण्यासाठी तुम्ही योग्य जागा निवडणे आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची देखील गरज नाही.