Fence plan : कुंपण योजना ठरेल शेतकरीहिताची..!

Ahilyanagarlive24 office
Published:

Fence plan : राज्य सरकारच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरच कुंपण योजना सुरू करण्याचे संकेत विधानभवनात दिल्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होऊन ही योजना शेतकऱ्यांच्या पिकासाठी मोठी संरक्षण देणारी ठरेल,

अशी भावना मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात इतर ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, पाथर्डी तालुक्यात अद्यापही पेरणीयुक्त पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे ज्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे,

त्यांना राज्य सरकारने बी-बियाणे मोफत दिले पाहिजेत तसेच इतरही शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी देण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रास सहन करावा लागतो, रानडुकरांमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते,

त्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होण्यासाठी कुंपण योजना महत्त्वकांशी ठरणार असून, राज्य सरकारने लवकरात लवकर ही योजना सुरू करावी. योजनेचा निश्चितपणे सर्व शेतकरी लाभ घेतील, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील शिंदे फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारने शेतकरी हितासाठी सुरू केलेले महत्त्वाकांशी निर्णय निश्चितच शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरतील, असे संतोष शिंदे, वैभव खलाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe