Maharashtra News : राजकारणासाठी विकास कामांना स्थगिती

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती. राजकारणासाठी अशी स्थगिती देणे दुर्देवी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील रणखांबवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी जि.प. सदस्य अजय फटांगरे, इंद्रजीत खेमनर, तुकाराम दातीर, पांडुरंग दातीर, माधव दातीर, भाऊसाहेब डोलनर, अण्णासाहेब कुदनर, जयराम ढेरंगे, गणेश सुपेकर, सुदाम सागर बाबाजी गळवे हौशीराम खेमनर, पुष्पाताई गुळवे, राहुल गंभीरे आदींसह पठार भागातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, मविआ सरकारच्या काळामध्ये आपण तालुक्यातील विविध रस्त्यांसह पठार भागातील अनेक रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली. या स्थगितीबाबत आपण सातत्याने आवाज उठवल्याने सरकारने स्थगिती उठवली आहे.

आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही अपवाद आहेत. शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना या विकास कामांसाठी येण्याचे बंधन घालने चुकीचे आहे.

शंकर खेमनर म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भागात 15 कोटींच्या रस्त्याला मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रणखांब ते खांबा हा पहिला कामाचा टप्पा सुरू होत असून या परिसरात अनेक विकास कामे आमदार थोरात यांच्या पुढाकारातून राबवली जात आहे.

मणिपुरमधील घटना वेदनादायी

भाजप हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून त्यांचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही. वाढलेली बेरोजगारी, महागाई यावर जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळ हा काँग्रेसचाच राहणार असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe