Hyundai Creta facelift : भारतात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV, Hyundai Creta लवकरच नवीन अवतारात मार्केटमध्ये येणार आहे. कंपनी याला नवीन फीचर्समध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अलीकडच्या काळात Kia ने देखील आपली नवीन Seltos लॉन्च केली आहे. अशा परिस्थितीत लवकरच क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च करणार असल्याची चर्चा आहे.चला यात कोणते नवीन फीचर्स पाहायला मिळतील ते जाणून घेऊया-
Hyundai च्या सर्वात लोकप्रिय SUV पैकी एक Hyundai Creta चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च केले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन क्रेटामध्ये मेकॅनिकल स्पेसिफिकेशन्स कायम राहतील, तर फीचर्समध्ये अनेक नवीन अपडेट्स पाहायला मिळतील.
रंग पर्याय
आगामी Hyundai Creta फेसलिफ्टच्या लूक आणि डिझाईनबद्दल बोलताना, यात कंपनीच्या प्रीमियम SUV Tucson सारखे DRLs असतील, जे समोरच्या ग्रिलमध्ये एकत्रित केले जातील. यासह, ते पुन्हा डिझाइन केलेले बंपर, पुन्हा डिझाइन केलेले टेल लॅम्प आणि इतर अनेक नवीन फीचर्स पाहिले जाऊ शकतात. या कारच्या इंटिरिअरमध्ये ऑल ब्लॅक आणि ब्लॅक/ब्राउनमध्ये दोन नवीन कलर पर्याय दिले जाऊ शकतात.
वैशिष्ट्ये
या कारमध्ये वाहन उत्पादक अनेक दमदार फीचर्स देऊ शकतात. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री, पुश स्टार्ट-स्टॉप बटण, बोस साउंड सिस्टम, ड्राईव्ह आणि ट्रॅक्शन मोड, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग आणि स्टँडर्ड कॅमेरा सेन्सर, स्टँडर्ड सेफ्टी सेन्सर, रिव्हर्स पार्किंग आणि इतर कॅमेरा फीचर्स मिळतील.
इंजिन
आगामी Hyundai Creta फेसलिफ्ट 1.5L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरियंटसह येईल. ज्यामध्ये 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनचे पर्याय दिसू शकतात. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑप्शनल CVT सह 6 स्पीड iMT ट्रान्समिशन पर्याय मिळतील.