Ahmednagar Politics : माझी विकास कामाची एक चांगली संस्कृती आहे, ती मी जपतो. मी माझ्याच विकास कामाचा झेंडा हाती घेत असतो. मात्र काही महाशय आमच्या विकास कामाचा झेंडा घेऊन मिरवत असल्याचे चित्र अकोळनेरमध्ये पहावयास मिळाले. असा टोला आ. निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेतला लावला.
चास येथे माजी सैनिकासाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे भूमिपूजन व विविध कामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, या प्रंसगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी लंके म्हणाले माजी सैनिक हे निस्वार्थीपणे समाजसेवा करत असतात, त्याच्यात एकजूट राहिली तर गावात विकासाचे कामे होतील.

जिथे माजी सैनिक संघटना असेल त्याच्यासाठी कार्यालय बांधून देणार असल्याचे सांगितले. सरकार गेल्यामुळे विकास कामे खोळंबली होती. मात्र आता राजकीय घडामोडीमुळे पुन्हा सत्तेत सहभागी झालो असल्यामुळे कामाचा अवशेष भरून निघणार आहे.
आठ दिवसात ७० लाखाचे काम मंजुर होणार असल्याचे सांगीतले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करण्यात आली. ओपन जीमचे साहित्य दिले. गुणवंत विद्यार्थी तसेच कोवीड काळात काम करणारे कर्मचारी तसेच सेवानिवृत्त जवान सुरेश काळे यांची नियुक्ती सहाय्यक असिस्टंट पदी झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला.