Maruti Brezza EV : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कंपन्यांकडून आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक इलेक्ट्रिक कारचा पर्याय उपलब्ध होत आहे.
देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी मारुती सुझुकी कंपनीकडून अजूनही त्यांची एकही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आलेली नाही. आता मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या इलेक्ट्रिक कारवर काम सुरु केले आहे.
म्रुत्यु सुझुकी कंपनीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच मारुतीची Brezza SUV कार कंपनीकडून लवकरच इलेक्ट्रिक रूपात सादर केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंगल चार्जवर 550 किमी पर्यंत धावणार
सध्या इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यावर अधिक भर दिला जात आहे. तसेच ग्राहकांची मागणी देखील इलेक्ट्रिक वाहनांना जास्त आहे. म्रुत्यु सुझुकी कंपनीकडून त्यांची ब्रेझा ही लोकप्रिय SUV कार लवकरच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर केली जाऊ शकते.
सध्या सोशल मीडियावर ब्रेझा च्या इलेक्ट्रिक व्हर्जनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही कार सिंगल चार्जवर 550 किमी धावेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कंपनीकडून नुकतेच ब्रेझाचे सीएनजी व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे.
Maruti Suzuki Brezza EV ची लांबी 4.3 मीटर असेल
मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या ब्रेझा इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात येऊ शकतात. या कारमध्ये कंपनीकडून 328 लिटरची मोठी बूट स्पेस दिली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची लांबी 4.3 मीटर असेल. तसेच कारमध्ये 60 kWh चा पॉवरफुल बॅटरी पॅक दिला जाणार आहे.
9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते
ब्रेझा इलेक्ट्रिक कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. मात्र कंपनीकडून या इलेक्ट्रिक कारबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
आकर्षक सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन रंग
मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या आगामी ब्रेझा या इलेक्ट्रिक कारमध्ये सहा आकर्षक मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन रंग पर्याय दिले जाऊ शकतात. कंपनीकडून त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार 2025 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. तसेच २०३० पर्यंत ६ इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.