LIC Superhit Scheme : मालामाल करणारी योजना! LICच्या या योजनेत करा 87 रुपयांची गुंतवणूक, मिळेल 11 लाखांचा बंपर परतावा

LIC Superhit Scheme

LIC Superhit Scheme : आजकाल देशामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक खाजगी आणि सरकारी योजना उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार गुंतवणूक करत असतो. मात्र अनेकांना कोणत्या योजनेमध्ये अधिक बंपर नफा मिळेल हे माहिती नसते.

जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एलआयसीची आधार शिला योजना सर्वोत्तम आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांमध्ये चांगला नफा कमवू शकता. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.

एलआयसीच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यावर कोणतीही जोखीम नाही. कारण यामधील सर्व योजना सरकारद्वारे चालवल्या जातात. त्यामुळे तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.

LIC आधार शिला योजना काय आहे?

आधार शिला योजना खास महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. ही एक एंडॉवमेंट, नॉन-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. जर योजनेच्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला लाभ दिला जातो.

एलआयसी आधार शिला योजनेसाठी पात्रता

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेमध्ये कोणत्या वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात? तर आधार शिला योजनेमध्ये ८ ते ५५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिला या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा कालावधी १० ते २० वर्षे आहे. या एलआयसी योजनेचे मॅच्युरिटी वय ७० वर्षे आहे.

आधार शिला योजनेतील विम्याची किमान रक्कम ७५ हजार ठेवण्यात आली आहे तर कमल विम्याची रक्कम 3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच योजनेची मुदत किमान १० वर्षे तर किमान २० वर्षे आहे.

सविस्तर समजून घ्या

जर तुम्ही दररोज २९ रुपये जमा केले तर वर्षभरात तुमची या योजनेमध्ये १०९५९ रुपयांची गुंतवणूक होईल. जर तुम्ही ही योजना वयाच्या १५ व्या वर्षी सुरु केलीआणि १० वर्षे ही योजना सुरु ठेवली तर या कालावधीमध्ये तुम्ही 2,14,696 रुपयांची गुंतवणूक यामध्ये करू शकता. तसेच योजनेची मुदत पूर्ण होईपर्यंत 3,97,000 रुपये तुम्हाला मिळतील.

11 लाख कसे मिळतील?

जर तुम्हालाही आधार शिला योजनेतून ११ लाख रुपये कमवायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला दररोज ८७ रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही दररोज ८७ रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षात तुमचे 31,755 रुपये जमा होतील. तसेच दहा वर्षात तुमचे 3,17,550 रुपये या योजनेत जमा होतील. तसेच योजना परिपक्व होईपर्यंत तुम्हाला ११ लाख रुपयांचा बंपर नफा मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe