Hero Splendor Plus Xtec : अवघ्या 10 हजारात घरी आणा हिरोची सर्वात शक्तिशाली बाईक, कुठे मिळत आहे संधी? पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Splendor Plus Xtec : अनेक वर्षांपासून हिरो भारतीय बाजार आणि भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असणाऱ्या बाइक्स सादर करत असते. मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या बाइक्सना मागणी आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने Hero Splendor Plus Xtec लाँच केली होती. या बाईकमध्ये कंपनीने शानदार मायलेज दिले आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 79,261 रुपये इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत 93,818 रुपये इतकी आहे. परंतु आता तुम्ही ती 10 हजारात खरेदी करू शकता.

जाणून घ्या Hero Splendor Plus Xtec ची किंमत

किमतीचा विचार केला तर Hero Splendor Plus XTEC मानक प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 79,261 रुपये इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत 93,818 रुपये इतकी आहे. कंपनीने आपल्या या बाईकमध्ये 97.2cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 7.9 bhp ची कमाल पॉवर आणि 8.05 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करेल.

ही बाईक i3S इंजिन स्टार्ट/स्टॉप सिस्टीमने सुसज्ज असल्याने तुम्हाला या बाईकमध्ये उत्तम मायलेज मिळते. इतकेच नाही तर कंपनीने स्प्लेंडर प्लस Xtec व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल कन्सोल, यूएसबी चार्जिंग पोर्ट, साइड स्टँड इंजिन कटऑफ, रीअर टाइम मायलेज रीडआउट आणि कॉल-एसएमएस अलर्ट यासह अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

जाणून घ्या Hero Splendor Plus Xtec कर्ज EMI डाउनपेमेंट पर्याय

Hero Splendor Plus Xtec प्रकाराची ऑन-रोड किंमत 93,818 रुपये इतकी आहे. परंतु जर तुमचे इतके बजेट नसेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही Splendor Plus Xtec ला 10,000 रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केला तर तुम्हाला 83,818 रुपये कर्जाची रक्कम मिळेल.

या कर्जाचा कालावधी 3 वर्षांपर्यंत असून त्याचा व्याज दर 9% आहे, नंतर तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 2,665 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागणार आहेत. Hero Splendor Plus Xtec प्रकाराला फायनान्स केला तर तुमच्याकडून रु. 12,000 पेक्षा जास्त व्याज आकारण्यात येईल.