Upcoming Bikes In India : बजेट तयार ठेवा! ऑगस्टमध्ये लॉन्च होणार ‘या’ ३ शक्तीशाली बाईक्स, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Upcoming Bikes In India

Upcoming Bikes In India : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक्स सध्या उपलब्ध आहेत. तसेच आता अनेक कंपन्यांकडून ग्राहकांसाठी अनेक नवीन बाईक्स लॉन्च केल्या जात आहेत. जुलै महिन्यामध्ये देखील बाईक्स लॉन्च करण्यात आल्या आहेत.

तसेच आता ऑगस्ट महिना देखील वाहन क्षेत्रासाठी खास ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये देखील तीन कंपन्यांच्या शक्तिशाली ३ शक्तीशाली बाईक्स लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी तीन नवीन बाईकचा पर्याय मिळणार आहे.

दुचाकी उत्पादक कंपन्यांकडून ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांच्या तीन शक्तिशाली बाईक्स सादर केल्या जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या कंपनीची कोणती बाईक लॉन्च होणार आहे.

हिरो करिझ्मा

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटर्सकडून त्यांची Karizma XMR बाईक लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीकडून त्यांची Karizma XMR बाईक ऑगस्ट महिन्यामध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

हिरो मोटर्सकडून त्यांची Karizma XMR बाईक २९ ऑगस्टला भारतामध्ये अधिकृतपणे लॉन्च केली जाणार आहे. या बाईकमध्ये कंपनीकडून 210 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे तसेच हे इंजिन 25 बीएचपी आणि 30 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

रॉयल एनफील्ड बुलेट 350

रॉयल एनफील्डच्या अनेक बाईक्सची भारतामध्ये क्रेझ आहे. त्यांची बुलेट बाईक सर्वाधिक लोकप्रिय आहे. आता ऑगस्ट महिन्यामध्ये रॉयल एनफील्डकडून त्यांची आणखी एक बाईक लॉन्च केली जाणार आहे.

रॉयल एनफील्डकडून त्यांची आगामी बाईक बुलेट 350 ऑगस्टमध्ये लॉन्च केली जाणार आहे. ३० ऑगस्ट रोजी ही बाईक कंपनीकडून सादर केली जाणार आहे. कंपनीकडून या बाईकची किंमत देखील ग्राहकांना बजेटमध्ये ठेवली जाणार आहे.

होंडा एसपी 160

होंडा कंपनीच्या देखील अनेक बाईक्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता होंडा कंपनीकडून त्यांची आणखी एक बाईक SP 160 बाईक लॉन्च केली जाणार आहे. या बाईकमध्ये SP 125 बाईक सारखेच फीचर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बाईकमध्ये युनिकोर्न बाईकसारखेच फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे आणि किंमत देखील युनिकोर्न बाईक इतकीच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe