Pm Kisan News: पीएम किसानचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, पैसे आले नसतील तर ‘या’ ठिकाणी साधा संपर्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan News:-  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले होते व आज चौदाव्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात आले.

राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे व यांनी पंतप्रधान किसन सन्मानिधीचा 14 वा हप्ता जारी केला आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 60 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.

 तुमच्या खात्यात पैसे आले की नाही अशा पद्धतीने तपासा

1- रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला संदेश तपासा पीएम किसान चा चौदावा हप्ता जारी झाल्यानंतर योजनेत नोंदणी केलेला मोबाईल नंबर वर खात्यात आलेले दोन हजार रुपये हस्तांतरित केल्याचा संदेश आलेला असेल तो तपासणे गरजेचे आहे.

2- मिनी स्टेटमेंट किंवा खाते बॅलन्स तपासा समजा तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकतात. परंतु बऱ्याच कालावधीनंतर देखील संदेश आला नाहीतर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा तुमच्या खात्याचा बॅलन्स चेक करू शकतात. तसेच बँकेत जाऊन पासबुक मध्ये एन्ट्री करून देखील तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले की नाही हे तुम्ही तपासू शकतात.

3- नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून जर तुम्ही नेट बँकिंग ची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाली की नाही हे नेट बँकिंग च्या साह्याने ऑनलाईन देखील तपासू शकतात. तसेच तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबर वर देखील मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकतात.

 तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता

समजा वाट पाहून देखील बऱ्याच कालावधीनंतर जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही पी एम किसान हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

1- पी एम किसान टोल फ्री नंबर18001155266

2- पी एम किसान नवीन हेल्पलाइन011-2430060

3- पी एम किसान लँडलाईन नंबर011-23381092,23382401

4- पी एम किसान हेल्पलाइन नंबर155261

या नंबर वर संपर्क साधू शकता.