Ajab Gajab News : जगात तुम्ही अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या असतील. तसेच पृथ्वीवर अनेक रहस्यमय गोष्टी दिवसेंदिवस पाहायला मिळतात. आजही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे गाड्या चालू न करता टेकडी चढतात.
पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी गाड्यांना पेट्रोल आणि डिझेलची गरज नाही. कारण या ठिकाणी गाड्या आपोआपच धावू लागतात. तसेच पार्क केलेल्या गाड्याही धावू लागतात त्यामुळे कार चालकांची चांगलीच तारांबळ उडते.

सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट
गाड्या चालू न करता देखीक धावू लागतात या ठिकाणचे नाव सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट असे ठेवण्यात आले आहे. सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट हे ठिकाण अमेरिकेतील मिशिगन शहरात आहे. या ठिकाणी कार आपोआपच धावू लागतात.
1950 मध्ये या ठिकाणाचा तपास करण्यासाठी एक शोध पथक गेले होते. या ठिकाणी शोध पथकातील कर्मचारी कार घेऊन गेले होते. सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट या ठिकाणी पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार बंद केल्या.
300 स्क्वेअर फूट त्रिज्येमध्ये येथे गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही, असे या टीमला त्यांच्या तपासणीत आढळून आले. या कारणास्तव येथील गाड्या स्वतःहून धावू लागतात. या ठिकाणी उभे राहिल्यास आपण एखाद्या स्पेसशिपमध्ये बसल्यासारखे वाटेल.
अमेरिकेतील अनेक रहस्यमय ठिकाणे
अमेरिकेमध्ये अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. अमेरिकेमध्ये अशी एक जागा आहे जिला स्पूक हिल म्हणून देखील ओळखले जाते. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या स्पूक हिल या ठिकाणी पार्क केलेल्या कार अचानकपणे डोंगराच्या दिशेने धावू लागतात. कारण इथेही गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही.
अमेरिकेतील सांताक्रूझ कॅलिफोर्नियामध्येही असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही. या ठिकाणाला ‘मिस्ट्री स्पॉट’ म्हणून ओळखले जाते. या जागेचा शोध १९३९ साली लागला आहे.
या ठिकाणच्या जागेबाबत अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले की या ठिकणी अदृश्य शक्ती आहे. मात्र या ठिकाणाची सखोल तपासणी करण्यात आले असता 150 चौरस फूट क्षेत्रामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही हे दिसून आले.