Ahmednagar News : पैसे दुप्पट करण्याचे आमीष ! व्यापारी फसला आणि पाच लाखांचे झाले…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पैसे दुप्पट करण्याचे आमीष दाखवून येथील एका व्यापाऱ्याला मोखाडाच्या जंगलात नेवून पुजा अर्चाचा बहाणा करून तब्बल ५ लाख रुपयांना लुटल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी दीपेश ताटकर यांचा शिवशक्ती इंटरप्रायजेस आईल डिस्टयुबिटर या नावाने व्यवसाय आहे. त्यांनी महेंद्र गोडसे याचा गाळा भाड्याने घेतला आहे. दोघांची ओळख झाल्यापासून महेंद्र हा नेहमी ताटकर यांच्या ऑफिसमध्ये येत होता. महेंद्र हा मे महिन्यामध्ये एका दिवशी या व्यापाऱ्याच्य कार्यालयात बसला असता, त्याने कळस येथील आपला मित्र अशोक अगविले हा पैसे डबल करून देतो, असे सांगितले होते.

त्यानंतर अशोक अगिवले यास आपल्या ऑफिसवर घेवुन ये नंतर बघु, असे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसानी महेंद्र अशोक अगिवले (रा. कळस) याला दुकानात घेऊन आला. आता पर्यंत आपण भरपुर लोकांना यापुर्वी पैसे डब्बल करून दिलेले असून आपण स्वतः ही पैसे डब्बल करून घेतलेले आहे. त्या पैशामध्ये मी गावालाच दहा एकर जमीन विकत घेतली असून त्यामध्ये मी पाण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांची पाईपलाईन केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तेव्हा आपण पैसे लावतो पण हमी म्हणुन तुम्हा दोघांचे कोरे चेक द्या, असे ताटकर यांनी सांगितल्याने, आता आमच्याकडे चेक बुक नाही, असे सांगून पैशाची हमी मी घेतो, असे तो म्हणाला. पैशाचा मोह न आवरल्याने काटकर हे पैसे तयार झाले. ६ जुलै रोजी रोजी मोखाडा येथे गेले, अशोक अगिवले, गुरुनाथ कातकरी, सोमनाथ पालवी यांनी एका वाहनांमधून प्रवास करून एका जंगलामध्ये गाडी चालक प्रकाश दिघे याने गाडी थांबविली.

अशोक अगिवले, गुरुनाथ कातकरी, सोमनाथ पालवी हे एका मोठ्या झाडाखाली थांबले. त्यावेळी महेंद्र गोडसे यांनी पाचशे रुपयांची एक नोट मागीतली. तेव्हा काटकर यांनी एक नोट दिली. या ठिकाणी नोटा दुप्पट केल्या असल्याचे दाखविण्यात आले. नोटा दुप्पट झाल्याचे सांगून एक लाख रुपये द्या, त्याचे पाच लाख रुपये करतो, असे सांगितले. त्यानंतर सर्वजण संगमनेरला आले.

(दि. ७) जुलै रोजी महेंद्र गोडसे याने दुकानावर येऊन ५ लाख रुपये तयार ठेवा. त्याचे जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखविले. (दि.८) जुलै रोजी सर्वजण मोखाडा येथे गेले. कापडी पिशवीमध्ये ठेवलेली ५ लाख रुपयांची रोख रक्कम सोमनाथ त्याच्याकडे देण्यात आली. मात्र रक्कम दुप्पट झाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे ताटकर यांच्या लक्षात आले. त्यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी महेंद्र गोडसे, अशोक आगिवले, गिता महेंद्र गोडसे, सोमनाथ पालवी, गुरुनाथ कातकरी यांच्या विरोधात पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe