अहमदनगर ब्रेकिंग : रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारा ट्रक पकडला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारा ट्रक पकडण्यात आला आहे. गव्हासह, मालट्रक असा एकूण ४६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सफौ. राजेंद्र वाघ यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एलसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, २७ जुलै २०२३ रोजी एका १६ टायरच्या अशोक लेलंड ट्रकमध्ये रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी आणला आहे.

हा गहू मध्यप्रदेश राज्यातून नगरच्या सुपा एमआयडीसीतील एका कंपनीत येणार असल्याने पोलिस पथकाने नगर-औरंगाबाद रोडवरील मुकुंदनगर येथे सापळा रचला, स्पिड ब्रेकर जवळ ट्रकला थांबविण्यात आले.

ट्रकमध्ये अनिल ताराचंद बगेल व अनोज नारायण सिंग बगेल दोघे आढळून आले. ट्रकची पहाणी केली असता त्यात रेशनिंगचा गहू आढळून आला. प्रमोद साहु यांच्या मालकीचा गहू असल्याचे सांगण्यात आले. हा गहू संकेश्वर फूड प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनी (सुपा एमआयडीसी) येथे घेवून चाललो असल्याची कबुली ट्रकमधील दोघांनी दिली.

त्यांच्या ताब्यातील ६ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५५ ते ६६ किलो वजनाचे ४५० गव्हाचे पोते तसेच ४० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ४६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe