Bhandardara Dam : भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार ! देशातील पहिले वॉटर म्युझियम होणार ?

Ahilyanagarlive24 office
Published:

Bhandardara Dam : उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भंडारदरा धरण परिसरात देशातील पहिले वॉटर म्युझियम उभारावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले. भंडारदरा धरणाला लवकरच १०० वर्ष पूर्ण होत असल्याने यानिमित्त भव्य कार्यक्रम करण्याचा मानस आहे.

सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसर हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांना देखील खुणावत असतो. भंडारदरा धरम परिसरात हजारो नागरिक पर्यटनासाठी येत असतात.

या परिसरात वॉटर म्युझियम उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आ. तांबे यांची ही संकल्पना आवडल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe