First Car Buying Tips : अनेकदा काहीजण पहिल्यांदाच नावीन कार खरेदी करत असतात. बाजारात अनेक कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. मात्र पहिल्यांदा नवीन कार खरेदी करताना अनेकजण गोंधळात पडतात. त्यांच्या पुढे अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या कार उपलब्ध असल्याने त्यापैकी कोणती कार त्यांच्यासाठी बेस्ट आहे त्यांना समजत नाही.
नवीन कार खरेदी करताना अनेकजण वेगवेगळ्या कंपनीच्या कार पाहत असतात. तसेच त्या कारची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेत असतात. मात्र अनेकांना वेगवेगळ्या कार पाहिल्यानंतर कोणती कार खरेदी करायची हे समजत नाही. तुम्हीही पहिल्यांदाच नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खालील कार स्वस्त आणि बेस्ट पर्याय आहेत.

मारुती एस प्रेसो

भारतीय ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. तुम्हालाही या कंपनीची एस प्रेसो कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या कारमध्ये 7-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, रिमोट की-लेस एंट्री, स्पीड अलर्ट सिस्टम, एअरबॅग्ज, ABS, EBD असे अनेक फीचर्स दिले जात आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.27 लाख रुपये आहे.
मारुती वॅगन आर

मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी वॅगन आर कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही देखील सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.52 लाख रुपये असणारी ही कार सहज खरेदी करू शकता. ही कार मायलेजच्या बाबतीत देखील सर्वोत्तम आहे. या कारमध्ये कीलेस एंट्री, एअरबॅग्ज, ABS, EBD, स्पीड अलर्ट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, सात-इंच इंफोटेनमेंट टचस्क्रीन देण्यात येत आहे.
रेनॉल्ट क्विड

तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी रेनॉल्ट क्विड कारदेखील सर्वोत्तम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 4.7 लाख रुपयांपासून सुरू होते. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय या कारमध्ये देण्यात येत आहे.
टाटा टियागो

टाटा मोटर्सची स्वस्त कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टियागोही कार सर्वोत्तम आहे. या कारमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक, सीएनजी आणि पेट्रोल पर्याय दिला जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.6 लाख रुपयांपासून सुरू होते.
Hyundai Grand i10

Hyundai कंपनीची Grand i10 कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत. तसेच या कारची एक्स शोरूम किंमत 5.73 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD, रियर पार्किंग कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात येत आहेत.












