Royal Enfield Classic 350 : अवघ्या 25 हजारात घरी आणा नवीन क्रुझर बाईक, मिळेल 41 kmpl मायलेज; पहा संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Royal Enfield Classic 350

Royal Enfield Classic 350 : देशात सध्या क्रुझर बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे. तसेच या क्रुझर बाईकच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. तरीही अनेक बाईकप्रेमी आपली आवडती बाईक खरेदी करत आहेत.

जर तुम्ही स्वस्तात बाईक खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही आता 25 हजार रुपयांत Royal Enfield Classic 350 खरेदी करू शकता. या बाईकमध्ये 41 kmpl मायलेज मिळत आहे. जाणून घ्या संपूर्ण प्लॅन.

जाणून घ्या किंमत

किमतीचा विचार केला तर Royal Enfield Classic 350 ची किंमत रु. 1,93,080 (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते तर ऑन-रोड रु. 2,20,501 पर्यंत जाते.

फायनान्स प्लॅन

ही क्रुझर बाईक खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बजेट 2 लाख रुपयांचे बजेट असावे. या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ही क्रुझर बाईक अवघ्या 25 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर सहज खरेदी करू शकता.

जर क्रुझर बाईक खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे 25,000 रुपये असतील तर, ऑनलाइन फायनान्स प्लॅन EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या रकमेच्या आधारे रु. 1,98,594 रुपयांचे कर्ज देऊ शकते. या कर्जावर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारण्यात येते.

समजा एकदा Royal Enfield Classic 350 साठी कर्ज मंजूर झाले तर, तुम्हाला रु. 25,000 चे डाउन पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार 3 वर्षांच्या कालावधीसाठी 6,042 रुपये प्रति महिना मासिक EMI तुम्हाला भरावा लागणार आहे.

इंजिन

Royal Enfield कडून या क्रुझर बाईकमध्ये 349.34 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 20.21 PS ची पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करत आहे. इतकेच नाही तर या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स जोडले आहे.

ब्रेकिंग सिस्टम आणि सस्पेंशन

याच्या ब्रेकिंग सिस्टिमबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवला आहे. या ब्रेकिंग सिस्टीममध्ये सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम जोडली आहे. तर सस्पेन्शन सिस्टिमबद्दल बोलायचे झाल्यास याच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ट्विन ट्यूब इमल्शन शॉक ऍब्जॉर्बर आणि मागील बाजूस 6 स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोड सस्पेन्शन दिले गेले आहे.

मायलेज

मायलेजबद्दल कंपनीचा असा दावा आहे की हे क्लासिक 350 एक लिटर पेट्रोलवर 41.55 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल. तसेच हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe