Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा मानवी जीवनात अनेकांना मोठा उपयोग होत आहे. तसेच आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी रोजच्या जीवनशैलीत अंमलात आणल्या तर नक्कीच तुम्हाला देखील फायदा होईल.
आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा आजही मानवाला मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. तसेच आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये पालकांना मुलांसमोर काही गोष्टी करण्यास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
मुलांना चांगले वागणूक दिली पाहिजे
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, मुले मोठी होताना त्यांच्या आई-वडिलांचा आदर्श घेत असतात. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांसमोर नम्रपणाने वागले पाहिजे. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षण, संस्कृती आणि आरोग्याबाबत नेहमी सतर्क असले पाहिजे. तसेच मुलांना चांगली वागणूक दिली पाहिजे.
मुले पालकांच्या सवयी अंगीकारतात
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, मुले नेहमी त्यांच्या पालकांचे गुण स्वीकारत असतात. मुलांना सक्षम आणि यशस्वी बनवण्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. पालकांच्या चुकीच्या सवयीचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे मुलांसमोर कधीही चुकीचे काम करू नये.
मुलांसमोर विचारपूर्वक बोला
प्रत्येक मनुष्याने प्रत्येक क्षणी विचारपूर्वक बोलले पाहिजे. तसेच पालकांनी त्यांच्या मुलांसमोर देखील विचारपूर्वक आणि काळजीपूरक बोलले पाहिजे. तुम्ही जे बोलाल तेच तुमची मुले देखील बोलतील. तुमची जशी भाषा असेल तशीच मुलांची देखील होणार असते. त्यामुळे नेहमी मुलांसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे.
पालकांनी मुलांसमोर खोटे बोलणे टाळावे
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, पालकांनी नेहमी मुलांसमोर खरे आणि व्यवस्थित बोलले पाहिजे. तसेच मुलांसमोर खोटे बोलणे टाळले पाहिजे. जर तुम्ही खोटे बोलला तर तुमचा मुलांच्या नजरेत आदर कमी होईल. लांना खोटे बोलण्यापासून आणि दिखाव्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांचा आदर करा
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, आई-वडिलांनी नेहमी एकमेकांसमोर एकमेकांचा आदर केला पाहिजे. जर आई-वडीलच एकमेकांचा आदर करत नसतील मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे.
एखाद्याचा अपमान करणे टाळा
अनेकदा पालक मुलांसमोर भांडत असतात. पती पत्नी जर मुलांसार भांडण करत असतील मुलांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. तसेच मुलांच्या मानती आदर कमी होईल त्यामुळे मुलंही तुमचा अपमान करायला मागेपुढे पाहणार नाहीत.