Upcoming Smartphones : ऑगस्टमध्ये लॉन्च होणार हे शानदार स्मार्टफोन, वनप्लस ते सॅमसंगचा आहे यादीत समावेश

Ahmednagarlive24 office
Published:
Upcoming Smartphones

Upcoming Smartphones : तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढील महिन्यात बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो.

अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याने ग्राहकांना नवीन आणि कमी बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणते स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत.

Redmi 12 5G

रेडमीचा आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. Redmi 12 5G हा स्मार्टफोन १ ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच FHD+ 90Hz डिस्प्ले देण्यात येणार आहे.

Motorola G14

1 ऑगस्ट रोजी भारतात Motorola G14 स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ पंच-होल डिस्प्ले देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाणार आहे.

Inifnix GT 10 Pro

Infinix GT 10 Pro हा स्मार्टफोन 3 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन 6.67-इंच FHD+ 120Hz AMOLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 8050 चीपसह लॉन्च करण्यात येणार आहे.

Samsung Galaxy F34 5G

सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. तसेच सॅमसंग कंपनीकडून त्यांचा आणखी एक Galaxy F34 5G स्मार्टफोन पुढील महिन्यात लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

iQoo Z7 Pro 5G

भारतीय बाजारपेठेत iQoo Z7 Pro 5G हा स्मार्टफोन देखील ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. फोन MediaTek Dimensity 7200 SoC द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे.

OnePlus Ace 2 Pro

OnePlus कंपनीचे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. आता OnePlus Ace 2 Pro देखील लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC आणि Android 13-आधारित ColorOS सारख्या वैशिष्ट्यांसह लॉन्च केला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe