Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघातात दोघे ठार !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील खोमणे वस्ती परिसरात भरधाव जाणारा टँकर आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी असल्याची माहिती बेलवंडी पोलिसांनी दिली.

मात्र, या अपघातात कांद्याच्या ट्रकमधील हमाली काम करणारे तीनजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, बेलवंडी पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळून येत नसल्याने जखमींची संख्या समजू शकली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरकुंभ येथील निलेश विलास जगताप यांचा एम. एच. ४२ – ए. आरश्र- ६९८५ हा टँकर दि. ३० जुलै रोजी रात्री कुरकुंभ येथून नगरकडे जात असताना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घारगाव शिवारातील खोमणे वस्ती परिसरात नगरकडून दौंडकडे कांदा घेऊन जाणाऱ्या एम. एच. १२ – एमश्र व्ही. ७४९७ या ट्रकला समोरासमोर जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, यात टँकर चालक बालाजी महादेव बन (वय ३०), वर्षे रा. कासारी, ता. आष्टी जि. बीड, याचा जागीच मृत्यू झाला तर अंकुश पोपट साळवे रा. लोणी व्यंकनाथ, ता श्रीगोंदा याचा नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर सागर रामदास दिघे (वय २९), वर्षे रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा व महेश तुकाराम चांदगुडे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe