Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांसाठी दोन नवीन फॉर्च्यूनर वाहने खरेदी करण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या दोन्ही वाहनांसाठी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे.
बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांना सध्या इनोव्हा हे वाहन आहे. ही वाहने दोन तीन वर्षांपूर्वीच घेण्यात आलेली आहेत. मात्र आता अध्यक्ष, उपाध्यक्षांसाठी नवीन फॉर्च्यूनर खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. त्यास मंजुरी देण्यात आल्याचे समजते.

जिल्हा बँकेचा इतिहासात प्रथमच बँकेसाठी अशा महागड्या गाड्या घेण्याचा विचार पुढे आला आहे. सहकार क्षेत्रात साधारणपणे महागडी वाहने न खरेदी करण्याची प्रथा आहे.
पण पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात फिरावे लागते त्यासाठी ही वाहने हवीत, असा मुद्दा बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते.