Mumbai Goa Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान ही गाडी चालवली जात आहे. मे महिन्यात ही गाडी सुरू झाली असून तेव्हापासूनच या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली आहे.
रेल्वे प्रवाशांची ही पसंती पाहता आता या गाडीचे डब्बे वाढवले जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या ही गाडी आठ डब्यांसहित धावत आहे. आठ डब्यांची ही मिनी भारत एक्सप्रेस ट्रेन मात्र लवकरच 16 डब्ब्याची बनणार आहे. निश्चितच रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे.
याबाबत मध्ये रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे रेल्वे बोर्ड देखील याला लवकरच मान्यता देणार असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. अशातच मात्र या गाडीबाबत आणखी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
ते म्हणजे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला स्लीपर कोच डब्बे जोडले जाणार आहेत. खरंतर मुंबई ते गोवा हे अंतर 586 किलोमीटरचे आहे. एवढे 586 किलोमीटर लांबीचे अंतर मात्र चेअर कार आसन व्यवस्था असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये बसून कापणे प्रवाशांसाठी अवघड बनत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जरी वेगवेगळ्या सोयी सुविधा असल्या तरी देखील बसून एवढ्या लांबीचा प्रवास रेल्वे प्रवाशांसाठी असह्य होत असल्याचे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे. खरंतर हा प्रवास ही गाडी आठ तासातच पार करते. मात्र आता पावसाळी वेळापत्रकानुसार या प्रवासासाठी या गाडीला दहा तासांचा वेळ लागत आहे.
अशा परिस्थितीत दहा तास सलग बसून प्रवास करणे प्रवाशांसाठी जिकीरीचे बनले आहे. यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोच या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 24 महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोच तयार होईल
आणि त्यानंतर या मार्गावर स्लीपर कोच वाली वंदे भारती एक्सप्रेस सुरू होणार असा आशावाद या निमित्ताने आता व्यक्त होऊ लागला आहे. रेल्वे मुंबई-गोवा वंदे भारतमध्ये स्लीपर कोच जोडण्याचं नियोजन आखत असल्याची माहिती रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. निश्चितच रेल्वेने हा निर्णय घेतला तर या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.