Farming Tips: कमीत कमी खर्चात आणि घरात करा ही शेती आणि कमवा लाखो रुपये

Ajay Patil
Updated:

Farming Tips: शेती करत असताना शेती सोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या कल्पनांचे रूपांतर तुम्ही व्यवसायामध्ये करू शकतात. याकरिता तुम्हाला सुरू करत असलेल्या व्यवसायाबद्दल थोडेसे ज्ञान आणि व्यवसाय करण्याची तयारी व जिद्दीने तो व्यवसाय पुढे नेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. असे व्यवसाय हे शेतीला पूरक म्हणून खूप महत्त्वाचे ठरतात. अशा व्यवसायांमधून कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेत तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात.

अगदी याचा अनुषंगाने जर आपण मशरूम फार्मिंग अर्थात मशरूम लागवडीचा विचार केला तर मशरूम लागवडीचे खूप मोठे फायदे शेतकऱ्यांना मिळू शकतात. मशरूम एक बुरशी असून यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. खायला देखील स्वादिष्ट असते व आरोग्याला देखील खूप फायदेशीर आहे.

मशरूम मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट, प्रोटीन तसेच विटामिन डी, सेलेनियम आणि झिंक यासारखे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे अनेक औषध बनवण्यासाठी देखील मशरूम चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात मशरूमला खूप मोठी मागणी असणारा असून बाजारपेठ देखील विस्तारित यात शंकाच नाही.

 मशरूम शेतीतील संधी

जर आपण सध्या मोठ्या शहरांमधील पंचतारांकित हॉटेलचा विचार केला तर अगदी महागड्या स्वरूपामध्ये मशरूमची डिश तुम्हाला मिळते. तुम्ही जर व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून जर मशरूम पिकवले व त्याची विक्री केली तर कमीत कमी भांडवलामध्ये व कमीत कमी जागेत खूप चांगला नफा या माध्यमातून तुम्हाला मिळवता येणे शक्य आहे. अनेक प्रकारच्या हॉटेल व्यवसायकांकडून मशरूमला खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे.

 मशरूम लागवड कशी करावी?

मशरूमची लागवड करणे खूप सोपे असून याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मोठ्या जागेची किंवा शेतीची आवश्यकता नाही. तुम्ही अगदी कमीत कमी जागेत किंवा तुमच्या घरातील एका खोलीतून देखील मशरूमची लागवड करू शकतात. याकरिता थोड्या प्रमाणामध्ये कंपोस्ट खताची आवश्यकता असते. या कंपोस्टमध्ये मशरूमच्या बिया पेरल्या जातात किंवा लागवड केली जाते. हे कल्चर किंवा कंपोस्ट बनवताना तुम्हाला भात किंवा गव्हाचा पेंड्याचा वापर करावा लागतो.

मशरूम चे चांगले उत्पादन मिळण्याकरता तुम्हाला मशरूम लागवडीच्या ठिकाणी तापमानाची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्हाला याकरिता 18 सेंटीग्रेड ते 30 सेंटीग्रेड तापमान मेंटेन ठेवणे गरजेचे असते. परंतु आता मशरूमच्या अशा बऱ्याच प्रजाती आल्या असून तुम्ही त्यांचे लागवड वर्षात केव्हाही करू शकता. साधारणपणे मशरूम चे चार प्रकार येतात. ते म्हणजे दुधाळ मशरूम, बटन मशरूम, ऑईस्टर मशरूम आणि स्ट्रॉ मशरूम हे होय.

 मशरूमची बाजारपेठ

जर आपण बाजारपेठेतील मशरूमचा दर पाहिला तर प्रति किलो 700 ते 1000 रुपये किलो इतका आहे. हॉटेल तसेच रेस्टॉरंट, तारांकित हॉटेल्स तसेच मॉल  आणि सुपर मार्केट इत्यादी ठिकाणी आणि विविध दुकानांमध्ये देखील याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.

त्यामुळे तुम्ही उत्पादन घेत असलेल्या मशरूमची तुम्ही जर व्यवस्थित व आकर्षक पॅकिंग करून विक्री केली तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो. सध्या जर मशरूम चा विचार केला तर मागणी जास्त व त्यामानाने पुरवठा खूपच कमी असल्याने याला चांगला बाजार भाव मिळतो. त्यामुळे योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेऊन जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही कमीत कमी खर्चात चांगला पैसा कमवू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe