Ahmednagar Crime News : दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून जेरबंद केले आहे. ओंकार विठ्ठल रोडे (वय २५ वर्षे, रा. वाळूज ता गंगापुर जि. औरंगाबाद, हल्ली रा. चिकालसे ता. मावळ जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
कोतवाली पोलिसांना आरोपी कामशेत (जि. पुणे) परिसरात असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक केली.
शाबाज नवाब शेख (वय २६ वर्ष, रा. पंचपीरचावडी, अंबिका बँके शेजारी अहमदनगर ) यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल २८ ऑगस्ट २०१८ रोजी मोटर वाहनानी मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून होता.
शाबाज नवाब शेख यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा केल्यापासून ओंकार विठ्ठल रोडे हा फरार झाला होता. ३ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, फरार आरोपी ओंकार रोडे हा कामशेत येथे आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी आरोपीला कामशेत परिसरातून कामशेत पोलीसांच्या मदतीने पकडले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.