Ahmednagar News : गोरक्षकांवर चांदणी चौकात हल्ल्यात जखमी झालेल्यांची जिल्हा रुग्णालयात जाऊन शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट ) विचारपुस करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, अशोक दहिफळे, ज्येम्स आल्हाट, गडाख पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करुन जखमींना योग्य ते उपचार मिळव्यात, अशी मागणी केली. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोरक्षकांवर हल्ले होत आहे, हा पोलिस प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे.
![Ahmednagar News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Chopper-attack-696x447-1.jpg)
गोहत्या रोखण्यासाठी हे गोरक्षक आपली जीवाची बाजी लावत असतांना त्यांच्यावर हल्ले होणे ही निंदाजनक आहेत. गोरक्षक कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची माहिती संबंधित पोलिसांना देत असतात, परंतु ते वेळेवर येत नसल्याने गोरक्षक स्वतः पुढाकार घेत आहेत.
परंतु त्यांच्यावर हल्ले होतात. हल्ला करणाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असून, त्यास वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे काल झालेला हल्ल्यातून हे गोरक्षक वाचले आहे, परंतु पुन्हा असे हल्ले होऊ शकतात, त्यासाठी पोलिस प्रशासनाने संबंधितांना अटक करुन कडक कारवाई करावी,
जेणेकरुन पुन्हा असे प्रकार घडणार नाही. गोरक्षकांवर होणारे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाही. हिंदूत्ववादी संघटना एकत्रित या विरोधी मोठे जनआंदोलन उभे करतील, असा इशारा संभाजी कदम यांनी यावेळी दिला.