Tisgaon News : तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावाला दोन घंटागाड्या असूनही धार्मिक स्थळांच्याजवळ शनी मंदिर माळीवाडा, गणपती मंदिर, प्रकाश महामुनी यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर व्यवस्थित पाणी न काढून दिल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले जात असल्याने ग्रामपंचायतीचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी केला आहे.
या संदर्भात लोखंडे यांनी काही भागातील कचऱ्यांचे ढीग व रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे फोटोच सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
त्यामुळे या ठिकाणच्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावून रस्त्यावर पाणी साचणार नाही, अडथळा निर्माण होणार नाही. याची ग्रामपंचायतने काळजी घेणे गरजेचे आहे. पंधरा वित्त आयोगाची कामे माळीवाडा परिसरात अपूर्ण स्थितीत असुन ती कामे त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.