Ahmednagar News : पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून दहा कोटींचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेचे अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक रस्ते, अमरधामाची कामे, भूमिगत गटार, ओपनस्पेस विकसित करणे आदी कामांचा समावेश आहे.
या कामांबरोबरच युती सरकारच्या काळात मागील वर्षापासून दोनही नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी सुमारे ३० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातील काही कामे सुरु असून, उर्वरीत कामे नगरपरिषद अंतर्गत पाईपलाईनची कामे मंजूर झाल्याबरोबर सुरु होणार आहेत.
नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मोठा भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले आहेत.