Astro Tips : शनी-राहूच्या युतीने बनतोय ‘अशुभ योग’; ‘या’ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा!

Content Team
Published:
Astro Tips

Astro Tips : ज्योतिष शास्त्रात शनी आणि राहूला खूप महत्त्व दिले गेले आहे. त्यांच्या चालीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. अशावेळी काहींना सावध राहण्याचा इशारा देखील दिला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनी आणि राहू खूप प्रभावशाली ग्रह मानले जातात. जर कोणत्याही राशींवर या ग्रहांचा प्रभाव असेल तर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

दरम्यान, 17 ऑक्टोबरपर्यंत शनी शतभिषा नक्षत्रात राहणार आहे. आणि यावेळी शनि आणि राहूची अशुभ युती देखील होणार आहे, ज्याचा प्रभाव काही राशींवर दिसून येईल. यामुळे 17 ऑक्टोबरपर्यंत काही राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सावध राहण्याची गरज आहे. चला कोणत्या आहेत या राशी? जाणून घेऊया.

कन्या

शनी आणि राहूच्या शतभिषा नक्षत्रामुळे कन्या राशीच्या लोकांना सर्वाधिक सावध राहण्याची गरज आहे. या दिवसांत या राशीच्या लोकांचा खर्च दुप्पट होऊ शकतो. त्याचबरोबर ते कोणत्याही संकटात सापडण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांना काळजीपूर्वक सर्व गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच या लोकांना धनहानी होण्याची देखील शक्यता आहे, कामात अपयशही येऊ शकते, आणि म्हणूनच मानसिक तणाव देखील वाढू शकतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना शनी राहुच्या संयोगामुळे छोटे-मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. पण या दिवसांत त्यांच्या प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे. म्हणूनच या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. शनी राहूची युती त्यांच्यासाठी दुष्परिणाम घेऊन येणार आहे. या दिवसांमध्ये या राशीच्या लोकांना धनहानी देखील होऊ शकते, म्हणूनच त्यांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कर्क

या राशीच्या लोकांवर शनीची सावली आहे. यामुळे त्यांचे आधीच नुकसान होऊ शकते. पण शनी आणि राहूच्या संयोगामुळे त्यांचे नुकसान आणखी वाढू शकते. त्यामुळे कशातही गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. ऑक्टोबरपर्यंतचा काळ त्यांच्यासाठी वाईट ठरेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठीही ऑक्टोबरपर्यंतचा काळ थोडा कठीण जाणार आहे. या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. त्याच्या कुटुंबातील लोकांनाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी जोडीदाराशीही भांडण होण्याचीही शक्यता आहे. अशावेळी काळजी घेणे फार महत्वाचे आहे.