भांडण झालं बायकोसोबत ! जीव घेतला निष्पाप पोरांचा, अहमदनगर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Published on -

Ahmednagar News : पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.आई-वडील आपल्या लेकरांसाठी जीवाचे रान करतात, आपल्या मुलांना जीवापाड जपत असतात, मात्र पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कर्जत तालुक्यातील अळसुंदा येथे शेतातील विहीरीत दोन बालकांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऋतुजा गोकुळ क्षीरसागर (वय ८ वर्षे) व वेदांत गोकुळ क्षीरसागर (वय ४ वर्षे) अशी या निष्पाप बालकांची नावे आहेत.

याबाबत पोलिस पाटील विजय अनारसे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली की, रविवारी (दि.६) दुपारी नितीन सीताराम अनारसे यांनी फोन करून माहिती दिली की गोकुळ क्षीरसागर यांच्या निबे रोडलगत असणाऱ्या शेतातील विहिरीत मुलीचे सैंडल दिसत आहेत.

त्यानुसार विजय अनारसे तसेच गावातील विभीषण अर्जुन अनारसे, सागर हनुमंत अनारसे, धनंजय नामदेव अनारसे, दिलीप चंद्रभान साळुंके, दत्तात्रय मुरलीधर जाधव यांच्यासह घटनास्थळी गेले.

सदर विहिरीतील पाण्यात ऋतुजा व वेदांत पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने त्यांना पाण्यातून वर काढून अॅम्बुलन्सने उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आणले. तेथील डॉक्टरांनी दोन्हींना तपासून ते मयत असल्याचे सांगितले,

गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले.

पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe