समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अपघात, ‘त्या’ बेवारस महिलेचा दफनविधी

Ahmednagarlive24 office
Published:

Accident : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा परिसरात शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केल्यानंतर ही महिला कोण, कुठली याचा तपास कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आला.

मात्र, तिची ओळख पटू शकली नसल्याने या महिलेचा दफनविधीसाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीने जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते. अखेर काल रविवारी तिचा दफनविधी अंत्यविधी ग्रामपंचायतीने चांदेकसारे परिसरात केला.

यावेळी माजी सरपंच केशवराव होन, सरपंच किरण होन, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जयद्रथ होन यांनी दफन विधीची तयारी पूर्ण करत या महिलेवर अंतिम संस्कार केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe