NCL Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी 16 व 17 ऑगस्ट 2023 पर्यंत (पदांनुसार) अर्ज सादर करावेत.
भरती अधिसूचनेनुसार “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनीच येथे अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव आणि रिक्त जागा
ही भरती प्रोजेक्ट असोसिएट-I पदासाठी होत असून या भरती अंतर्गत फक्त 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तापसूनच येथे अर्ज सादर करावेत, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होणार असून, जे उमेदवार सध्या पुण्यात नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी 35 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.
अर्ज पद्धती
या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील पदांकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 व 17 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे (ऑनलाईन) केली जाणार आहे. अर्ज पाहून उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही www.ncl-india.org या वेबसाईटला भेट देऊ शकता.
असा करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज http://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळावरून सादर करू शकतात.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
निवड प्रक्रिया
-निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
-मायक्रोसॉफ्ट टीम्स, गुगल मीट, सिस्को वेबएक्स इत्यादीसारख्या योग्य माध्यमाद्वारे मुलाखत ऑनलाइन घेतली जाईल व किंवा संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
-मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.