Ahmednagar News : तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना आणि काष्टी परिसरातील दारूच्या हात भट्टयांवर श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट करत ५ जणांवर गुन्हे दाखल केले.
अशोक हिरामण पवार, संदिप ताराचंद पवार (दोघे रा. श्रीगोंदा कारखाना), गणिता कुच्या उर्फ विशाल पवार (रा. जमदारमळा), मंडाबाई सखाराम पवार, फिनेल चिच्या पवार (तिघे रा. जामदार मळा, काष्टी, ता. श्रीगोंदा) या पाच जणांवर गुन्हे दाखल केले.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीगोंदा कारखाना व काष्टी येथील जामदारमळा परीसरात हातभट्टीची दारु तयार होत असल्याची माहिती मिळाली.
त्या नुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भल्या पहाटे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग व संपत कन्हेरे व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून श्रीगोंदा फॅक्टरी व जामदार मळा, काष्टी या ठिकाणी जावून दारूच्या हात भट्टयांवर कारवाई केली.
यात गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे एक लाख ४० हजार रुपये किंमतीचे एक हजार चारशे लिटर कच्चे रसायन व १४ हजार ५०० रुपये किंमतीची १४५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु असे एकूण एक लाख ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट केली.
तर अशोक हिरामण पवार, संदिप ताराचंद पवार, गणिता कुच्या उर्फ विशाल पवार, मंडाबाई सखाराम पवार, फिनेल चिच्या पवार या पाच जणांवर गुन्हे दाखल केले.