Honda Activa 125 : जर तुम्हाला स्वस्तात स्कुटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही अवघ्या 10 हजार रुपयात होंडाची नवीन Activa 125 स्कूटर खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने ही स्कुटर लाँच केली आहे.
जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका, कारण आता तुम्ही EMI वर ही शानदार स्कुटर खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने या स्कुटरमध्ये जबरदस्त मायलेज आणि उत्तम फीचर्स दिली आहेत. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
जर Honda Activa 125 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास या स्कूटरमध्ये 124 cc इंजिन देण्यात आले आहे, जे जास्तीत जास्त 8.30 PS पॉवर आणि 10.4 न्यूटनचा पीक टॉर्क जनरेट करत आहे. Honda Activa 125 चे मायलेज 55 kmpl आहे. देशात सर्वात जास्त विकली जाणारी ही स्कूटर हिरो, बजाज, यामाहाच्या सुझुकी अॅक्सेस 125, टीव्हीएस ज्युपिटर 125 या लोकप्रिय स्कूटरला टक्कर देते.
जाणून घ्या Honda Activa 125 Drum डाउनपेमेंट तपशील
किमतीचा विचार केला तर Honda Activa 125 Drum प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 79,806 रुपये इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत 94,239 रुपये इतकी आहे. समजा तुम्ही 10,000 रुपये डाऊनपेमेंट करून फायनान्स केला तर तुम्हाला 84,239 रुपयांचे कर्ज मिळेल. जर तुम्ही 3 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज घेतले तर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 2,679 रुपये EMI म्हणून भरावे लागणार आहेत. या स्कूटरवर तुम्हाला 3 वर्षात 12,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज दिले जात आहे.
जाणून घ्या Honda Activa 125 Drum Alloy कर्ज EMI तपशील
किमतीचा विचार केला तर Honda Activa 125 Drum Alloy व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 83,474 रुपये इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत 98,243 रुपये इतकी आहे. जर तुम्ही 10,000 रुपये डाऊनपेमेंट करून या प्रकाराला फायनान्स केला तर तुम्हाला 88,243 रुपये कर्ज मिळेल. या कर्जाचा कालावधी 3 वर्षांचा आहे आणि व्याज दर 9% आहे, नंतर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी ईएमआय म्हणून 2,806 रुपये द्यावे लागणार आहेत. या स्कूटरवर तुम्हाला 3 वर्षात एकूण 13 हजार रुपये व्याज दिले जाईल.