Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टींचा मानवी जीवनात आजही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.
आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टींचे पालन करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तसेच चाणक्याच्या नीतिमूल्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
कठीण काळात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही मार्गाचा वापर केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. चाणक्यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र, राजकारण आणि मुत्सद्देगिरी तसेच व्यावहारिक जीवनातील अनेक मार्ग सांगितले आहेत. कठीण काळात अनेकजण या मार्गांचा अवलंब करत असतात.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मानवाने केल्यानंतर माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. तसेच कुटुंबातील सदस्यांना आणि स्वतः त्यांना आर्थिक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे चाणक्यांनी ५ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही न करण्याचा सल्ला दिला आहे.
या पाच गोष्टींमुळे माता लक्ष्मीचा कोप होतो
आचार्य चाणक्य यांच्या मते अनेकांकडून दैनंदिन जीवनात अनेक चुका होत असतात. त्या चुकांचा परिणाम त्यांच्या आर्थिकतेवर होत असतो. दैनंदिन जीवनातील चुकांमुळे माता लक्ष्मी नाराज होते. माता लक्ष्मी नाराज झाल्यांनतर माणसाची आर्थिक स्थिती नाजूक होत जाते आणि त्याला आयुष्यभर पैशांची कमतरता भासते.
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर कधीही खरकटी भांडी घरामध्ये ठेऊ नये. विशेषतः अशी भांडी स्वयंपाक घरामध्ये ठेवणे म्हणजे माता लक्ष्मीला नाराज करणे आहे. अशाने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि गरिबीची समस्या वाढते.
अनेकजण विनाकारण अनावश्यक खर्च करत असतात. मात्र अनावश्यक खर्च करणाऱ्या व्यक्तींवर देखील माता लक्ष्मी नाराज होत असते. जर तुम्हीही असा खर्च करत असाल तर तो त्वरित टाळा कारण तुम्ही देखील कंगाल होऊ शकता.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहे की, संध्याकाळच्या वेळी घरामध्ये झाडू मारू नये. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. तसेच घरामध्ये घाण देखील ठेऊ नये.
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणीही कोणाचा अपमान करू नये. जे लोक इतरांचा अपमान करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी नाराज होते. माता लक्ष्मी अशा लोकांवर कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे नेहमी सर्वांसोबत सभ्य वागा.