Ahmednagar Crime : मुलगा नसल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण करीत शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी या प्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासु आणि सासरा यांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २००४ साली फकिरा शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांच्या मुलीचा विवाह तालुक्यातील मांडवगण येथील जावेद गुलाब आतार याच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत.
मात्र मुलगा नसल्याने तसेच चारित्र्यावर संशय घेतल्याने पीडितेचे पती, सासू, सासरे आणि नंदेशी वारंवार वाद होत होते. तिला अनेकदा मारहाण करून शारीरिक तसेच मानसिक छळवणूक करण्यात येत होती. रविवारी (दि.६) सकाळी आमच्या मुलीने फाशी घेतल्याचा फोन आला.
याप्रकरणी पीडितेचा पती जावेद आतार, सासरे गुलाब आतार, सासू मुमताज आतार (तिघे रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) आणि नणंद शायरा अब्बास आतार (रा. वाहेरा, ता. आष्टी, जि. बीड) या चार जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासु आणि सासरा यांना अटक करण्यात आली.