Ahmednagar News : पतीने बायको आणि आईवर कोयत्याने हल्ला केला,जखमी पत्नीचा अखेर मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे तीन दिवसांपूर्वी अज्ञात कारणावरून पतीने पत्नी व आईवर कोयत्याने हल्ला केला होता. याघटनेत पत्नी व आई दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या.

उपचारादरम्यान आरोपीची पत्नी उषा रोडे वय ३५ वर्षे, रा. चोभेवाडी हीचा नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी आरोपीने सुध्दा स्वतः घराजवळ असणाऱ्या डीपीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर देखील नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, दि.६ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास रामचंद्र दशरथ रोडे याने अलकाबाई दशरथ रोडे (वय ६५) व त्यांची सुन उषाताई रामचंद्र रोडे या दोघींना अज्ञात कारणावरून मारहाण करत ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले होते.

यात या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाते. मात्र दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी यातील आरोपीची पत्नी उषाताई रोडे हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आज पत्नीचा मृत्यू झाला असल्याने पोलीस आरोपी विरोधात पुढील कारवाई करणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe