जगातील प्राचीन अशा सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिड्स. हे पिरॅमिड्स अशा प्रकारे बांधले गेले आहेत की त्यामध्ये ठेवले जात असलेले महनीय व्यक्तींचे मृतदेह आजही शाबूत आहेत. म्हणजे एवढ्या वर्षांत हे मृतदेह निसर्गाच्या नियमानुसार विघटित झालेले नाहीत.
अशा मृतदेहांना ‘ममी’ असे म्हणतात, हे आपण जाणतो. पण विज्ञान ज्या काळी फारसे प्रगत झालेले नसताना ही किमया इजिप्तमधील लोकांना कशी काय साधली असेल हे आजवर न उलगडलेले रहस्य आहे. या रहस्याचा भेद करणारे अनेक दावे आजवर करण्यात आले आहेत.

आता शास्त्रज्ञांनी इजिप्तमधील पिरॅमिड्सचे रहस्य उलगडल्याचा नव्याने दावा केला आहे. इजिप्तमधील गिझा ग्रेट पिरॅमिड हा सुमारे दोन कोटी ग्रॅनाईट ब्लॉक्सचा वापर करून बनवण्यात आला आहे. यातील एक एक ग्रॅनाईट ब्लॉक सुमारे दोन टन वजनाचा आहे.
एवढे वजनदार ब्लॉक्स अवजड अशा क्रेन किंवा अन्य यंत्रांच्या मदतीशिवाय या ठिकाणी आणले जाऊ शकले नाहीत. सबब हे पिरॅमिड उभारण्यासाठी अवकाशातून एलियन्सनी हे मोठमोठे ब्लॉक्स या ठिकाणी आणले,
असा आश्चर्यजनक दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. या दाव्यामुळे ते इजिप्तच्या या प्राचीन पिरॅमिडच्या उभारणीमागील रहस्याचा उलगडा केल्याचे सांगत आहेत.
पुरातत्त्व संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने पिरॅमिडचे रहस्य उलगडल्याचा दावा केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की एवढे महाकाय ग्रॅनाईट ब्लॉक्स वाहून नेणे त्या काळी शक्य नव्हते. म्हणून परग्रहांवरील जीवांच्या म्हणजेच एलियन्सच्या मदतीने हे काम करून घेण्यात आले असावे…