Seema Haider : मागील काही दिवसांपासून सीमा हैदर ही चर्चेचा विषय बनली आहे. ती भारतात कशासाठी आली? तिचा भारतात येण्यामागचा हेतू काय होता? याचा पोलिसांकडून तपास घेण्यात आला. आपल्या नवऱ्याला सोडून ती भारतात आल्याने हे प्रकरण सोशल मीडियात चांगलच तापले आहे.
इतकेच नाही तर सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवले नाही तर भारताला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. सीमा हैदर आता लवकरच पाकिस्तानमध्ये परतणार आहे. तिच्या तिकिटाचादेखील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
तिकीटाचा फोटो आणि चित्रपटाचे पोस्टर शेअर करत समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी असे लिहिले आहे की, ‘देशाच्या गद्दारांना देशात राहायला जागा मिळणार नाही, तुमच्या नायिकेसोबत पाकिस्तानात जावे. अमित जानी यांना देशामध्ये हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणायची आहे.
गुलाम हैदर यांना पाठवले निमंत्रण
मागील काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक-निर्माते अमित जानी याना सीमाच्या कथेवर चित्रपट बनवत असल्याचे वृत्त समोर आले आहे. सीमा यांचे पहिले पती गुलाम हैदर यांनाही त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव ‘कराची ते नोएडा’ असे ठेवले आहे. या चित्रपटासाठी त्यांनी ऑडिशन्सही घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी त्यांनी सीमाचे पती गुलाम हैदर याला दिल्लीला किंवा मुंबईला येण्यास सांगितले आहे.
या चित्रपटासाठी सीमाचे पहिले पती गुलाम हैदर यांच्याशी बोलू इच्छित असल्याचे सांगत अमित जानी यांनी त्याबाबत एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांना सीमाबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करायची आहे. गुलाम यांना सांगण्यात आले आहे की ते भारतात येऊ शकत नसतील तर त्यांचे लेखक सौदी अरेबियाला जाण्याची शक्यता आहे. तेथे जाऊन त्यांचे मत जाणून घेऊ शकतात.
याबाबत अमित जानी असे म्हणतात की, देशातील आणि जगातील लोकांना सचिन आणि सीमाची कहाणी जाणून घ्यायची आहे. यासाठी त्यांनी जवळपास 50-60 मॉडेल्सच्या ऑडिशन्स घेतल्या आहेत. तरुणांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे