Mars Transit 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ या ग्रहाला एक वेगळे महत्त्वं आहे. कारण मंगळ हा ग्रह आक्रमकता, उत्साह, उर्जा, धैर्य, शक्ती, जमीन आणि विवाह यांचा कारक मानण्यात येतो. त्यामुळे या ग्रहाला कुंडलीमध्ये विशेष महत्त्व आहे. या ग्रहाच्या स्थितीमुळे त्याचा अनेक राशींच्या लोकांना व्यापार, कार्यक्षेत्र आणि धनसंपत्तीमध्ये लाभ होत असतो.
मंगळ हा ग्रह 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.12 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा शुभ परिणाम काही राशींवर दिसून येणार आहे. या काळात या राशींचे नशीब बदलणार आहे. तसेच त्यांना नोकरी-व्यवसायामध्येही प्रचंड लाभ होणार आहे.
कर्क रास
ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळी कर्क रास असणाऱ्या लोकांच्या धैर्य, ऊर्जा आणि पराक्रमात वाढ होईल. तसेच त्यांच्या कुटुंबात भरभराट येईल. इतकेच नाही तर त्यांना नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.
वृश्चिक रास
वृश्चिक रास असणाऱ्या लोकांना मंगळाच्या संक्रमणाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. या दरम्यान त्यांच्या विरोधकांचा पराभव होऊ शकतो. त्याशिवाय त्यांना कर्जाच्या बाबतीत यश मिळेल. या राशीचे लोक आजारी आहेत, त्यांचे आरोग्य उत्तम राहू शकतो. परंतु, मंगळाच्या भ्रमणादरम्यान तुम्ही तुमच्या वाणीवर संयम ठेवावा. तुम्हाला या काळात नोकरीत बढती मिळू शकते.
धनु रास
या काळात धनु रास असणाऱ्या लोकांचे परदेशात नोकरीचे स्वप्न साकार होऊ शकते. खरंतर मंगळाच्या संक्रमणातून तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घ्या की व्यावसायिकांना दूरचे प्रवास करावे लागणार आहेत. तसेच तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला नोकरी-व्यवसायात आर्थिक फायदा होईल.
मकर रास
मकर रास असणाऱ्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण खूप शुभ मानले जाते. कारण या काळात त्यांना मानसिक शांतता मिळेल. त्यांच्या नोकरीत बढती होईल. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना या काळात आर्थिक फायदा होईल. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबात शुभ किंवा शुभ कार्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही धार्मिक यात्रा करू शकते. या काळात दान करावे.