भाजप कार्यकर्त्याचा मोठा गौप्यस्फोट ! संगमनेरच्या मतदार यादीत शेकडो दुबार मतदार

Published on -

Ahmednagar News : संगमनेर नगरपरिषदेच्या मतदार यादीत शेकडो दुबार मतदार आढळले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते ऋषिकेश आरोटे यांनी मतदार याद्यांची पडताळणी केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊन दुपार मतदारांची नावे कमी करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी पाहणी करून ही नावे कमी करण्याचे काम तातडीने सुरू झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाकडुन मतदार पडताळणी कार्यक्रम चालु आहे.

आपल्या गावातील मतदान यादी दुरुस्ती व्हावी, यासाठी आरोपी यांनी संपूर्ण मतदार यादींची पडताळणी केली. संगमनेर शहरात दोन नगरसेवक निवडुन जातील येवढे मतदान मतदान यादीत डबल आहेत, अशी ” माहिती आरोटे यांनी दिली.

मतदान यादीचे सर्व कामकाज हे आता ऑनलाईन स्वरुपात झाल्याने नव्याने नोंदणी हि डबल आली, तर ती रद्द करता येते. परंतु मतदान यादीत असलेले डबल मतदान हे कमी करण्यासाठी त्यावर आक्षेप हा महत्वाचा असतो.

तो आक्षेप हा केंद्र व राज्य निवडणूक आयोग कार्यक्रमावेळी कोणी घेत नसल्याने ते मतदार जसेच तसे मतदान यादीत राहतात. हे निदर्शनास आल्यानंतर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe