Ahmednagar News : मोराची व लांडोर पक्षाची संख्या ग्रामीण भागात वाढली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी शहरालगतच्या निमगाव कोन्हाळे व निमशेवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र असल्याने मोराची संख्या वाढलेली आहे. पक्षाचा राजा म्हणून मोराला ओळखले जाते. २६ जानेवारी १९६३ रोजी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून निवड करण्यात आली.

मोराचे वय ४ ते ६ वर्षापर्यंतचे असते वजन ४ किलो पर्यंत असतो. मोराचा हिरव्या निळ्या रंगाचा चमकदार पिसारा मनमोहक असतो. मोराचे लांडोर बरोबर मिलन पार पडले की, त्याचे असलेले पिसे हे गळुन पडतात, अशा या मोराची व लांडोर पक्षाची संख्या सध्या येथील ग्रामीण भागात वाढलेली दिसुन येत आहे.

या भागातील शेतकरी विजय गाडेकर यांनी त्यांच्या शेतात मोर पावसाळ्यात नृत्य करताना व्हिडिओ तयार केला असून तो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

सध्या राहाता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात या मोराचे नृत्य चांगले चर्चेले आहे. हा मोर अन्नाच्या शोधात फिरताना दिसत आहे. मोराला काही पक्षी त्रास देताना दिसत असून त्रास वाचवण्यासाठी तो पिसारा फुलवून चालतांना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe